असे होतो आम्ही

आपण बदलत असतो. आपण सतत बदलत असतो. आपल्या पेशी पण जुन्या होतात नष्ट होतात, त्या जागी नव्या येतात. म्हणजेच आपण काल जे होतो ते आज नाही, विचारांनी आणि शरिराने देखील. छायाचित्रे त्या त्या क्षणांचे आरसे असतात. आता आपण ती पाहतो तेव्हा नक्कीच आपण पुढे आलेलो असतो. छायाचित्र हा नेहमीच आपला भूतकाळ असतो, चार क्षणांनी का होईना.

बुधवार, २१ जुलै, २०१०

शनिवार, १९ जून, २०१०

शुक्रवार, २१ मे, २०१०

१९ मे २०१०


.
.

.
.

.
.

.
.

मंगळवार, २० एप्रिल, २०१०

१९ एप्रिल २०१०


मोहिनी आणि राधा
एकाच रंगाच्या नव्वीन नव्वीन टी-शर्टांमधे आम्ही कश्या दिसतो आहोत?  छान दिसतोय म्हणा हं.  मोहिनी आणि राधा एका शांत मुद्रे मधे (त्यामुळेच हे जरा दुर्मीळ चित्र आहे)


मोहिनी, सीमा आणि राधा
आईच्या जवळ चाललेला दंगा. 


मोहिनी, सीमा, तुषार आणि राधा
आजकाल हे बरं झालंय, कॅमे-यात टायमर लावायचा आणि धावत चित्रात जाउन बसायचे.  पण घाई केली की असेच छायाचित्र येणार ना?


मोहिनी, तुषार, सीमा आणि राधा
एकाच चित्रात सगळ्यांनी शिरायचा एक भाबडा प्रयत्न.  हा जरा बरॅपॅकी जमलाय बरका.


मोहिनी, तुषार आणि राधा
आज रात्री फोटो काढावे लागले कारण बाबाला काम एके काम होते दिवस भर.  पण सगळे तय्यार होतो बरं फोटो काढायला.


तुषार, मोहिनी, राधा
कुकुच्कू

मंगळवार, २३ मार्च, २०१०

१९ मार्च २०१०

मोहिनी, सीमा, तुषार आणि राधा.
मागे आमचा टेडी पण दिसतोय.  राधाच्या हातात दोरीवरच्या उड्या मारायची दोरी आहे.  सीमा पुढच्या महिन्यात न वैतागता छायाचित्रासाठी बसणार आहे.

चिंगू, तुषार बाबा आणि चिंटू
यावेळेस चिंटू चे कंपास बॉक्स खाणे सुरू आहे.  मोहिनी ला फोटोसाठी छान हसता येते नाही का?  जागा चुकलीच बाहेर अंगणात काढायला हवे होते फोटो.

मोहिनी ताई आणि राधा
हे प्रेम फोटोसाठी बरे.  एरव्ही आहेच आपले झिंज्या वगैरे उपटणे, धक्का देणे, मला ताईने मारले, राधाने माझे घर मोडले वगैरे.

राधा
हनुवटी वर जो व्रण दिसतोय ना तो गरम तव्याचा.  आम्ही आईला मदत करायला नको तिथे कडमडलो होतो ना तेव्हाचा.  आईने क्रिम लावले आहे ना मग होईलच लवकर बरा.
मोहिनी
फोटो काढण्यासाठी एका जागेवर बसण्याची शिक्षा झालीय तिला.  एव्हाना १५ एक उड्या मारून झाल्या असत्या ना.  

फॉलोअर