आपण बदलत असतो. आपण सतत बदलत असतो. आपल्या पेशी पण जुन्या होतात नष्ट होतात, त्या जागी नव्या येतात. म्हणजेच आपण काल जे होतो ते आज नाही, विचारांनी आणि शरिराने देखील. छायाचित्रे त्या त्या क्षणांचे आरसे असतात. आता आपण ती पाहतो तेव्हा नक्कीच आपण पुढे आलेलो असतो. छायाचित्र हा नेहमीच आपला भूतकाळ असतो, चार क्षणांनी का होईना.

मंगळवार, २३ मार्च, २०१०

१९ मार्च २०१०

मोहिनी, सीमा, तुषार आणि राधा.
मागे आमचा टेडी पण दिसतोय.  राधाच्या हातात दोरीवरच्या उड्या मारायची दोरी आहे.  सीमा पुढच्या महिन्यात न वैतागता छायाचित्रासाठी बसणार आहे.

चिंगू, तुषार बाबा आणि चिंटू
यावेळेस चिंटू चे कंपास बॉक्स खाणे सुरू आहे.  मोहिनी ला फोटोसाठी छान हसता येते नाही का?  जागा चुकलीच बाहेर अंगणात काढायला हवे होते फोटो.

मोहिनी ताई आणि राधा
हे प्रेम फोटोसाठी बरे.  एरव्ही आहेच आपले झिंज्या वगैरे उपटणे, धक्का देणे, मला ताईने मारले, राधाने माझे घर मोडले वगैरे.

राधा
हनुवटी वर जो व्रण दिसतोय ना तो गरम तव्याचा.  आम्ही आईला मदत करायला नको तिथे कडमडलो होतो ना तेव्हाचा.  आईने क्रिम लावले आहे ना मग होईलच लवकर बरा.
मोहिनी
फोटो काढण्यासाठी एका जागेवर बसण्याची शिक्षा झालीय तिला.  एव्हाना १५ एक उड्या मारून झाल्या असत्या ना.  

1 टिप्पणी:

  1. If you can change the name of the blog, make it "Ase Aahot Aamhi". Because, even when it is understandable that you are doing it for posterity, every new post is going to be a current thing for that time. Think over it. ... :) And really, add photos that are taken outside in the open.

    उत्तर द्याहटवा

फॉलोअर